तेर्सेबांबर्डे येथील गणेश घाटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते भूमिपूजन

0 minutes, 2 seconds Read

 

कुडाळ दि ‌१३ ऑक्टोबर (प्रतिनिधी)

 

 

तेर्सेबांबर्डे येथील गणेश घाटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते भूमिपूजन

 

 

 

आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे काजराळवाडी येथे मंजूर केलेल्या गणेश घाटाचे भूमिपुजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सदर काम होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार आ. वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध करून दिला व ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला. त्याबद्दल काजराळवाडीतील ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त करत येत्या निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांची हॅट्रिक होवो अशी सदिच्छा व्यक्त केली

 

 

यावेळी एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जिल्हा परिषद सदस्य रमा तामाणेकर ,माणगाव विभाग संघटक कौशल जोशी, मंगेश परब ,अशोक बांबार्डेकर, अनिल देऊलकर, उदय बांबर्डेकर, अक्षय मांजरेकर, प्रसाद साटेलकर, गजा परब, प्रकाश बगळे, आनंद बगळे, बाळा कोलार, भाग्यश्री बगळे, जानवी बगळे, अस्मिता बगळे, मनोज बगळे, विजय बगळे, आदीसह पदाधिकारी,शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *