भिडे कुटुंबीय,नाडण व वेदविद्या संवर्धन मंडळ, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४/१०/२४ ते २०/१०/२४ या कालावधीत भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
श्री स्वामी समर्थ मंगलकार्यालय, जामसंडे जामसंडे येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कीर्तनकार व प्रवचनकार समर्थ भक्त श्री मकरंद बुवा सुमंत(रामदासी) भागवत कथा निरुपण करणार आहेत. दि.१४ऑक्टोबर २४ ते १९ ऑक्टोबर २४ या दिवशी सायंकाळी ४.०० ते ८.३० व २० ऑक्टोबर २४ रोजी सकाळी ९.०० ते १.०० या कालावधीत होणाऱ्या या कथा निरुपणाला उपस्थित राहून कथा श्रवणाचा आनंद घ्यावा असे आवाहन भिडे कुटुंबीय, नाडण व वेदविद्या संवर्धन मंडळ, देवगड यांनी केले आहे.