कणकवली बांधकरवाडी येथील नवरात्रौउत्सवाचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

0 minutes, 0 seconds Read

कणकवली दि ६ ऑक्टोबर ( प्रतिनिधी)

कणकवली बांधकरवाडी येथील नवरात्रौउत्सवाचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली बांधकरवाडी येथील नवरात्रौउत्सवाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यांच्या शुभ हस्ते श्रीफल फोडून शुभारंभ करण्यात आला. गेली अनेक वर्षे या बांधकरवाडी येथील नवरात्री – दांडिया उत्सवाचा शुभारंभ सुशांत नाईक यांच्या हस्ते संपन्न होतो. आज पासून दसऱ्या पर्यंत या मंडळाच्या वतीने दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात येते. बांधकरवाडी मंडळाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा पुष्पगुछ देत सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांचा देखील मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, सचिन आचरेकर, वॉर्ड अध्यक्ष -श्री सुमित राणे, प्रविण सावंत, मारुती राणे, विष्णू राणे, रामदास ठाकूर, श्री साटम, मंगेश सदडेकर, राजेश साटम, राजु मेस्त्री, बाबु राणे, राहुल ठाकूर, नरेश राणे व आदी बांधकर वाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *