देवगड तालुक्यात लाभार्थी सन्मान यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद

 

देवगड (प्रतिनिधी)

 

देवगड तालुक्यात लाभार्थी सन्मान यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद

 

 

महाराष्ट्र राज्यातील युती सरकारच्या वतीने विविधयोजना राबविण्यात आल्या आणि त्या योजना यशस्वी करण्यात महाराष्ट्र राज्याचे महायुती सरकार यशस्वी झाले त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन संपूर्ण राज्यात करण्यात आले आहे. या अनुषंगाने देवगड तालुक्यात ही लाभार्थी सन्मान यात्रा रविवारी जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्या मंदिर पटांगणात दाखल झाली असून या लाभार्थी सन्मान यात्रेद्वारे महाराष्ट्र राज्यातील युती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहितीचे स्टॉल त्याचप्रमाणे नागरिकांना मनोरंजनासाठी विविध स्टॉल आयोजन या लाभार्थी सन्मान यात्रेत करण्यात आले आहे .या लाभार्थी सन्मान यात्रेचे स्वागत आणि शुभारंभ देवगडचे माजी आमदार अँड अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी तालुकाध्यक्ष राजू शेटये, शहराध्यक्ष योगेश पाटकर युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, सरचिटणीस शरद ठूकरूल, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोसकर,मनीषा जामसंडेकर व अन्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी महिला सक्षमीकरणाशी कटिबद्ध लाडकी बहीण योजना, अर्धे तिकीट तीन सिलेंडर भेट, युवक कल्याण लाडका भाऊ योजना, पोलीस मेगा भरती, समृद्ध महाराष्ट्र ,कृषी विकासाचा ध्यास ,जलयुक्त शिवार योजना, एक रुपयात पिक विमा सौर ऊर्जा कृषी पंप ,आरोग्यसेवा अंतर्गत महात्मा फुले जन आरोग्य योजना, पाच लाखापर्यंत उपचार मोफत ,नवीन वैद्यकीय महाविद्यालय ज्येष्ठ नागरिकांची कल्याण अंतर्गत देशभरात मोफत तीर्थ दर्शन या राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती विशद केली यावेळी अनेक महिला लाभार्थी उपस्थित होत्या.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *