सावंतवाडी शहर भाजप महिला प्रभारी पदी उत्कर्षा सासोलकर यांची निवड,सारंग यांनी दिल्या शुभेच्छा

 

सावंतवाडी (प्रतिनिधी) दि २१ सप्टेंबर २०२४

 

 

सावंतवाडी शहर भाजप महिला प्रभारी पदी उत्कर्षा सासोलकर यांची निवड,सारंग यांनी दिल्या शुभेच्छा

 

 

विधानसभा निवडणुकीबाबत भाजप कडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात येत असून निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नव्याने नियुक्त्या करण्यात येत आहेत.सावंतवाडी शहर महिला भाजप प्रभारीपदी माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर यांची भाजपकडून नियुक्ती करण्यात आली आहे.सासोलकर यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी भाजप कार्यालयात आयोजित बैठकीत सावंतवाडी विधानसभा संयोजक महेश सारंग यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रचार प्रमुख माजी आमदार राजन तेली,जिल्हा सरचिटणीस तथा सावंतवाडी विधानसभा संयोजक महेश सारंग.माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवराज लखमराजे भोसले,दोंडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण,खरेदी विक्री चेअरमन प्रमोद गावडे,सुहास गवंडलकर,नाथा नाडकर्णी,बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी,आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर,मंदार कल्याणकर,वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष गिरप तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *