बांदा प्रतिनिधी १४ सप्टेंबर २०२४
बांदयात सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या … अशा जयघोषात तर फटाक्यांच्या आतषबाजीत बांद्यात सात दिवसांच्या एकूण ६१० घरगुती बाप्पाना भावपूर्ण निरोप देण्यात आला. पावसाने घेतलेली विश्रांती अन लहानांपासून थोरांपर्यंत असलेली भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.
ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने गणरायांचे विसर्जन करण्यात आले. बांदा शहरात ठिकठिकाणी तेरेखोल नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. ग्रामीण भागात पाणवठ्याकडे सर्व गणपती एकत्रित येत मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी गावाच्या भल्यासाठी सामुदायिक गाऱ्हाणे गणपती चरणी घालण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांच्या आतिषबाजीत व मिरवणूकीने गणरायांचे विसर्जन करण्यात आले.
